गोपिनाथ गड :

गोपिनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी लाखावर लोक जमतात मात्र खरच आपण कोठे आलो आणि कोणाला अभिवादन करतो यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.मात्र मृत्यु हे सत्य आहे .मग असत्य का वाटत. त्याच कारण देवगुणाची माणस जन्माला आल्यानंतर जनकल्याणासाठी त्यांनी केलेल काम हे प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेल असत.बीड जिल्ह्यात साहेबांवर लोक वेड्यासारखं प्रेम करायची. राजकारण करताना आयुष्यात त्यांनी फार मोठा संघर्ष केला. मात्र संघर्षावर मात करून अशक्य गोष्टी शक्य करणारा नेता हि त्यांची कामगिरी होती.

साहेब परत या :

आज मुंडे साहेब असते तर काय झाले असते हे केवळ स्वप्न आहे मात्र हे स्वप्न साकार करण्याच काम त्यांची कन्या पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे करत आहेत. मुंडे साहेबांची कर्तबगारी हि मृत्युपेक्षाही कितीतरी पटीने सत्य वाटणारी आहे. म्हणुन आज प्रत्येकाला साहेब नाहीत यावर आंतरीक भास सत्य पटवुन देणारा वाटत नाही. पंढरीचा पांडुरंग ज्याप्रमाणे भक्तांच्या डोळ्यासमोरून जात नाही त्याप्रमाणे आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या डोळ्यासमोरून मुंडे साहेबांचा चेहरा जाता जात नाही. शेवटी एकच म्हणावेसे वाटते..साहेब तुम्ही परत या...!! .

संघर्षकन्या :

माझी लढाई कोणत्या पक्षाशी नसून थातूरमातूर नेत्याशीं तर मुळीच नाही. सत्तेचा कळस कुणीही व्हा, परंतु पायाचा दगड मी राहणार आहे. मात्र, मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, असे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मा.ना.पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित सभेत सांगितले.मुंडे साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या तिन्ही मुलींनी साहेबांप्रमाणेच संघर्ष करून महाराष्ट्रामध्ये भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आहे.